दगडाची खाण कोसळून ८ मजुरांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

दगडाची खाण कोसळून ८ मजुरांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

नाथियल | Hnahthial

ईशान्य भारतातील मिझोरमध्ये (mizoram) दगडाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. खाणीमध्ये मजूर काम करत असताना त्यांच्यावर दगड कोसळले आहेत. सोमवारी दुपारी खाणीतले कामगार जेवणाच्या सुट्टीनंतर परतत असताना ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित मजुरांचा शोध सुरू आहे. मजुरांचा शोध घेण्यासाठी बचावपथक, स्थानिक लोक, बीएसएफ, आसाम रायफल यांना पाचारण करण्यात आले आहे.

मिझोराममध्ये जशी ही दुर्घटना घडली त्याप्रमाणे काहीच दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील मोरबीमध्येही दुर्घटना घडली होती. गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती.

पूल कोसळल्याने १४३ हून अधिक जण पाण्यात बुडाल्याची भिती वर्तवली जात होती. घटनास्थळी सुरक्षारक्षक दाखल झाले आणि त्यांनी शर्तीच्या प्रयत्नांनी बचाव कार्याला सुरूवात केली देखील केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com