ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीवर दगडफेक : भाजपा कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू

जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील घटना
 ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीवर दगडफेक : भाजपा कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू

जामनेर Jamner प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat election) विजयानंतर विजयी (victory procession) उमेदवार व कार्यकर्ते मंदिरावर दर्शन घेण्यासाठी जात असताना बाजूच्या गच्चीवरून पूर्वनियोजित कट आखून पराभूत विरोधकांनी दगडफेक (Stone pelting) केली. या दगडफेकीत धनराज शिवराम माळी (वय 30 ) (BJP worker died) या भाजपा कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे दोन गटात तुफान हाणामारी  होऊन सुमारे 15 ते 20 लोक जखमी झाले. विरोधकांनी लाठ्या काठ्या ने वार करून विजयी गटावर अचानक हल्ला केल्याने दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले होते. टाकळी खुर्द ग्रा.प.मध्ये भाजपा विरुद्ध भाजप अशीच लढत दोन गटात झाली. घटनेची माहिती कळतात पोलीस निरीक्षक किरण शिंदे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

टाकळी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत गेल्या पंधरा वर्षापासून सरपंच म्हणून सत्ता भोगणारे भाजपा कार्यकर्ते सारंगधर अहीरे यांच्या जनसेवा पॅनल विरुद्ध भाजपाच्या दुसऱ्या गटातील जितेंद्र माळी व विजय चौरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल मध्ये लढत झाली. आज या निवडणुकीचा निकाल लागून परिवर्तन पॅनलचे १० पैकी ७ उमेदवार विजयी होऊन परिवर्तन पॅनलने बहुमत मिळविले.

त्यामुळे गेले पंधरा वर्षापासून सत्ता भोगणारे सरपंच सारंगधर अहीरे व त्यांच्या मुलाच्या ही बाब जिव्हारी लागली.  पराभवाने संतप्त झालेल्या विरोधकांनी हल्ल्याची पूर्वतयारी केली.  मंदिराच्या बाजूला असलेल्या घरावर दगडे गोळा करून विजयी मिरवणुकीवर हल्ला करण्याचा डाव आखल्याचे समजते.

जामनेरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परिवर्तन पॅनलचे विजयी सरपंच पदाचे उमेदवार जितेंद्र माळी विजय चौरे व त्यांचे सर्व कार्यकर्ते टाकळी खुर्द गावात दाखल होऊन मिरवणुकीने मंदिरावर दर्शन घेण्यासाठी गेले असता बाजूच्या अहिरे यांच्या घरावरून मिरवणुकीवर विरोधकांनी दगडफेक सुरू केली. व त्याचवेळी काही विरोधकांनी खाली येऊन लाठ्या-काठ्याने हल्ला चढविला. यामध्ये सुमारे 25 ते 30 जण जखमी झाले असून धनराज शिवराम माळी (वय 30) ह्या भाजपा कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला.

धनराज या निरपराध कार्यकर्त्याचे वडील वारले असून आईला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी या अविवाहित कार्यकर्त्यावर होती. त्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याने म्हातारी आई निराधार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर मृताच्या नातेवाईकाने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. घटनेची माहिती समजतात जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पोलीस स्थापन घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले टाकळी खुर्द या गावी सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासन तर्फे टाकळी खुर्द या गावी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला 65जणांविरद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये माजी सरपंच सारंगधर अहिरे, मंगेश समाधान वराडे, श्रीकांत आहीरे, शालिक आहीरे, सोपान आहीरे, व इतर अशा 66 जनावर आयपीसी कलम 324, 143 ,147, 148, 149, 337 ,504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

या दंगलीचे मुख्य सूत्रधार माजी सरपंच सारंगधर अहीरे व त्यांचा मुलगा श्रीकांत हा फरार झाल्याने त्यांना अटक करा मगच प्रेत ताब्यात घेऊ अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे सुमारे सहा तास डेड बॉडी उपजिल्हा रुग्णालयात पडून होती अखेर या आरोपीस अटक केल्याने परिस्थिती निवळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 45 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com