Sunday, April 28, 2024
Homeनाशिकनिवडणूक निकालानंतर दोन गटात दगडफेक; जमावबंदी लागू

निवडणूक निकालानंतर दोन गटात दगडफेक; जमावबंदी लागू

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Elections )निकाल जाहीर होताच तालुक्यातील टोकडे ( Tokde)येथे विजयाचा जल्लोष करणारे उमेदवार समर्थक व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन दगडफेक सुरू झाल्याने गावात एकच पळापळ होऊन तणावाचे वातावरण पसरले आहे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करून अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात जमावबंदी लागू केली आहे.

- Advertisement -

टोकडे ग्रामपंचायत ( Tokde Grampanchayat )चा निकाल जाहीर होऊन भाजप पुरस्कृत सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचे पॅनल निवडून आल्याने विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते गावात जल्लोष करीत घोषणा देत असताना या पॅनलच्या विरोधातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीस आक्षेप घेतल्याने दोन्ही गटात शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यावसान दगडफेकीत झाले .

मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाल्याने गावात एकच पळापळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या दंगलीची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व पोलिसांनी टोकडे येथे धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करत सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त गावात तैनात केला आहे .अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात जमावबंदी देखील लागू करण्यात आली असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलिसां तर्फे घेतला जात आहे या दगडफेकीत चार ते पाच जण जखमी झाले असल्याचे कळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या