Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशआठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजार गडगडला, 'या' कारणाने Sensex-Nifty कोसळले

आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजार गडगडला, ‘या’ कारणाने Sensex-Nifty कोसळले

मुंबई | Mumbai

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या (Share Market Crash) पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला. एसजीएक्स निफ्टीत ३०० अंकांची घसरण झाली.

- Advertisement -

जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहेत. अमेरिकेच्या शेअर बाजारात शुक्रवारी शेवटच्या सत्रात मोठी घसरण झाली होती. अमेरिका सध्या महागाईच्या संकटाला तोंड देत आहे.

महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले. शुक्रवारी अखेरच्या सत्रात गुंतवणूकदारांनी शेअर विक्रीचा सपाटा लावला. याचा परिणाम आज भारतीय बाजारावर पाहायला मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या