शेअर बाजार गडगडला; Sensex, Nifty मध्ये मोठी घसरण

शेअर बाजार गडगडला; Sensex, Nifty मध्ये मोठी घसरण
शेअर बाजार

मुंबई | Mumbai

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही दिसून आले.

शेअर बाजार सेन्सेक्स (Sensex) 1118 अंकांच्या घसरणीसह 53184 च्या पातळीवर सकाळी सुरू झाला होता. तर दुसरीकडे निफ्टी (Nifty) 324 अंकांच्या घसरणीसह 15877 वर सुरू झाली होती. सध्या सेन्सेक्समध्ये 1450 अंकांची घसरण असून तो 52,850 पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्सबरोबरच दुसरीकडे निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही जवळपास 400 अंकांनी घसरला आहे. निप्टी सध्या 15,800 च्या पातळीवर स्थिरावली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com