ठाकरे गटाचे अजून 'इतके'आमदार शिंदे गटाच्या संपर्कात - उदय सामंतांचा दावा

ठाकरे गटाचे अजून 'इतके'आमदार शिंदे गटाच्या संपर्कात - उदय सामंतांचा दावा

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) आणि उपनेत्या सुषमा अंधारे (Deputy Leader Sushma Andhare) यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी हा दावा फेटाळून लावला आहे...

ते म्हणाले की, राज्यात मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागण्याचा प्रश्नच येत नाही.आमच्याकडे जवळपास १७० आमदार (MLA) आहेत. अजून १२ ते १३ आमदार शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात आहे.आमची संख्या १८२ वर जाऊ शकते. त्यामुळे वेळेवरच निवडणुका होतील, असे सामंतांनी म्हटले आहे.

तसेच प्रत्येक फुटीर गटात एक शिंदे असतोच, असे विधान संजय राऊत यांनी सकाळी केले होते. यावर बोलतांना सामंत म्हणाले की, हे करण्याएवढे आम्ही बालवाडी किंवा शाळेत जात नाही. आम्ही देखील चार चार वेळा निवडून आलो आहोत. आमच्यासोबत ५० सीनियर आमदार आहेत. त्यामुळे अशा विधानांनी कोणी विचलित होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय जे शिवसेनेचे (Shivsena) फाउंडर होते ते विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे जो धक्का बसला आहे त्या धक्क्यातून सगळे सावरावे त्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोलाही सामंत यांनी लगावला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com