नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार ४१९ वर
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार ४१९ वर

एकाच दिवशी विक्रमी ३९० पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला असून आज चोवीस तासात जिल्ह्यात विक्रमी 390 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्ताचा आकडा 9 हजार 419 इतका झाला आहे.

तर एकाच दिवसात जिल्ह्यातून 1150 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 312 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार, आज दिवसभरात एकुण 390 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

यामध्ये एकट्या नाशिक शहरातील 311 रूग्ण आहेत. यात शहरातील नवीन नाशिक, काझीपुरा, काठेगल्ली, रामवाडी, हिरावाडी, पेठरोड, दिंडोरीनाका , औरंगाबादरोड, नाशिकरोड, पंचवटी, ंपेठरोड , जुने नाशिक, जेलरोड, इंदिरानगर, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. तर जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रशिक्षणार्थी 5 परिचारीकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 5 हजार 722 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 78 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 2 हजार 321 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक वडाळीभोई, पिंपळगाव बसवंत विल्होळी, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लहवीत, दिंडोरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत.

मालेगामध्ये आज 8 रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 197 वर पोहचला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 179 वर पोहचला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात 7 जणांचा मत्यू झाला.

यामध्ये सर्वाधिक 4 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 390 झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील 312 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणाऱ्यांचा आकडा 6 हजार 391 वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने 1 हजार 150 संशित रूग्ण दाखल झाले आहेत.

यामध्ये नाशिक शहरातील 776 आहेत. जिल्हा रूग्णालय 8, ग्रामिण भागातील विक्रमी 238, मालेगाव 19, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 9 व होम क्वारंटाईन 100 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून 34 हजार 777 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 24 हजार 559 निगेटिव्ह आले आहेत. 9 हजार 419 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 हजार 678 रूग्ण उपचार घेत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com