
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गाच्या (OBC) राजकीय आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका (Election) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे...
यामुळे जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर या सात नगरपालिकांची निवडणूक आता पुढे ढकलली गेली आहे. या निर्णयामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी दुसरीकडे मात्र ओबीसींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप (BJp) - शिंदे सरकारने (Shinde Government) घेतला आहे. त्यामुळे या सातही नगरपालिकांच्या निवडणुकीच्या (Election) वेळी थेट नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे.
नगरपालिकांमधील पक्ष बलाबल पाहता ते कमी अधिक आहे. त्यामुळे एकाच पक्षाचा थेट नगराध्यक्ष होईल, असे पुरेसे पक्षीय बलाबल नसल्याने आगामी होऊ घातलेल्या या निवडणुकांमध्ये आघाडी-युतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नगरपालिका नगर परिषदांची निवडणूक ही रंगतदार ठरेल, अशी चिन्हे आहेत.