
दिल्ली | Delhi
अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) राज्यामधील सॅन होजे (San Jose) शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून तो चोरण्यात आला आहे. तर या पुतळ्याचा भाग असलेला अश्वच्या पायांकडील भाग तसाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा चोरीला गेला आहे.
कॅलिफोर्निया येथील ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील (Guadalupe River Park) पुतळा हा पुणे येथील सॅन जोसच्या भगिनी यांनी शहराला भेट म्हणून दिला होता. उल्लेखनीय असे की, उत्तर अमेरिकेत (North America) असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅन जोस डिपार्टमेंट ऑफ पार्क्स, रिक्रिएशन आणि नेबरहुड सर्व्हिसेसने यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, 'ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आहे. हे कळवताना आम्हाला अत्यंत खेद होत आहे. मात्र, हा पुतळा कधी चोरीला गेला? याबद्दल अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.
सॅन जोस डिपार्टमेंट ऑफ पार्क्स, रिक्रिएशन आणि नेबरहुड सर्व्हिसेसने केलेल्या ट्विटमध्ये एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो. छत्रती शिवाजी महाराज यांचा हा अश्वरुढ पुतळा आहे. मात्र, हा फोटो पुतळा बेपत्ता होण्यापूर्वीचा आहे. सोबतच संबंधित विभागाने त्याच ट्विटमध्ये आणखी एक फोटो जोडा आहे. ज्यात पुतळ्याचा फोटो दिला आहे मात्र त्यात दिसते की, फोटोत आता बेपत्ता झालेल्या पुतळ्याचा फोटो फक्त पाया शिल्लक आहे.
दरम्यान, आता याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, 'सिस्टर सिटी' मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन होजे शहराला दिलेला आणि तेथील उद्यानात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे.
यासोबतच त्यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती देखील केली आहे. छत्रपतींचा पुतळा चोरी झाल्याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे.