Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामहाविकास आघाडीचा ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद

महाविकास आघाडीचा ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी Lakhimpur Khiri in Uttar Pradesh येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेचा निषेध Protesting the incident of farmers being crushed under a vehicle म्हणून राज्यातील महाविकास आघाडीतर्फे Mahavikas Aaghadi येत्या ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदची Statewide Bandh हाक देण्यात आली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

- Advertisement -

शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची जी घटना घडली त्याच निषेध या बंदच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.भाजपची शेतक-यांप्रती असणारी वागणूक क्रूरपणाची आहे. भाजप आणि त्यांची सत्ता असलेल्या राज्यांत शेतकरी आंदोलने चिरडण्यात येत आहेत. त्याचा निषेध करणे आवश्यक असल्याने हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आघाडीतील मित्रपक्ष यांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या दुर्देवी म़त्यूबददल खेद व्यक्त करण्याचा ठराव करण्यात आला.यावेळी मंत्रिमंडळाने मरण पावलेल्या शेतक-यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, मंत्रिमंडळाने लखीमपूर खिरीत मरण पावलेल्या शेतकऱ्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. यासंदर्भात जयंत पाटील यांनीच प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी ठरावास अनुमोदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या