Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलन

काँग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये झाला आहे.

- Advertisement -

या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच करोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात सोमवारी (दि. 7) रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती ती आज 32.90 रुपये म्हणजे 258 टक्के आहे तर डिझेलवर 3.56 रुपये होती ती आज 31.80 रुपये आहे म्हणजे 820 टक्के वाढ. या एक्साईज ड्युटीतून केंद्र सरकारने गेल्या 7 वर्षात तब्बल 20 ते 25 लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे.

तसेच 2001 ते 2014 या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. 2018 मध्ये तो 18 रु. प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 18 रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर 2.50 तर डिझेलवर प्रति लिटर 4 रुपये कृषी सेस घेतला जातो. या दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी 11 वाजता राज्यभर एकाचवेळी एक हजार ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन पेट्रोल पंपांवर आंदोलन करून केंद्रसरकारचा तीव्र निषेध केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या