Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यायांची लायकी पोस्टरबाजीची, राज्य करण्याची नाही : नारायण राणे

यांची लायकी पोस्टरबाजीची, राज्य करण्याची नाही : नारायण राणे

सिंधुदुर्ग | Sindhudurg

जिल्हा बँक निवडणुकीसाठी (Sindhudurg District Bank Election) तिन्ही पक्ष एकत्र येतात. निवडणुकीसाठी अर्थमंत्री येतात आणि पराभव करून जातात यालाच ‘अक्कल’ म्हणतात. यांची लायकी फक्त पोस्टरबाजी करण्याची आहे राज्य करण्याची नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना लगावला…

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या (BJP) विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले, सिंधुदुर्गात सध्या भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राणे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची सत्ता जिल्ह्यातील देवता आणि जनतेच्या आशीर्वादाने आली आहे. माझे कायकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेल्या मेहनतीमुळेच ही सत्ता मिळाली आहे.

आता लक्ष महाराष्ट्र सरकार कसे स्थापित करता येईल यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहेत. विधानसभा तसेच लोकसभेत कोकणात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास यावेळी राणेंनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, मविआ उमेदवारांना आज त्यांची जागा दाखवून दिली आहे. सतीश सावंत यांच्याबद्दल बोलताना ३६ मत मिळत नाही आणि विधानसभेची भाषा करतो अशी टीका नारायण राणेंनी केली.

मी सगळ्यांना पुरून उरलो आणि आता केंद्रापर्यंत जाऊन पोहोचलो आहे. या निवडणुकीत सर्व कार्यकर्ते, नितेश आणि निलेश राणे यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे निवडणुकीचे श्रेय मी त्यांनाच देईल, असेही राणे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या