गंगाघाट परिसरात अतिक्रमण झाले तर याद राखा; मनपा आयुक्तांची तंबी

गंगाघाट परिसरात अतिक्रमण झाले तर याद राखा; मनपा आयुक्तांची तंबी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका आयुक्तांनी गंगाघाट (Gangaghat) अतिक्रमण (Encroachment) मुक्त करण्याचा संकल्प घेतला असून त्याच्यावर त्यांची बारीक नजर कायम आहे. खातेप्रमुखांच्या झालेल्या बैठकीतदेखील त्यांनी गंगाघाट परिसरात अतिक्रमण होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश देत या ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सूचना केल्या, तसेच शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीदेखील अतिक्रमण होणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी अतिक्रमण झाल्यास थेट सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार असल्याची तंबी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी प्रशासनाला दिली.

नाशिक महानगरपालिकेचे (Nashik NMC) आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी गंगाघाट परिसर सुटसुटीत करण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी एका वेळेस पायी तसे दुसर्‍या वेळेला रिक्षाने या संपूर्ण भागाचा अभ्यास केला. यानंतर त्यांनी येथील सर्वप्रकारचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुमारे दोनशे लहान-मोठ्या अतिक्रमणांवर हातोडा चालवला संपूर्ण गंगाघाट परिसर अतिक्रमणमुक्त केला होता.

कारवाईनंतर गंगाघाट परिसरात पुन्हा अतिक्रमण (Encroachment) होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात येत असून शनिवार तसेच रविवार या सुटीच्या दिवशी देखील या संपूर्ण परिसरात अतिक्रमण करणाऱ्यावर मनपा (NMC) कारवाई करीत आहे. यासाठी महापालिकेचे पंचवटी तसेच पूर्व विभाग अधिकाऱ्यांची विशेष पथक पोलीस संरक्षणासह या ठिकाणी कायम सतर्क ठेवण्यात आले आहेत.

गंगाघाट परिसरात (Gangaghat Area) जगभरातून लाखो भाविक भक्तिभावाने येतात. मात्र या ठिकाणी विविध प्रकारचे खाद्य पदार्थांस इतर साहित्य विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले होते. यशवंत पटांगण (Yashwant patangan) असो की गौरी पटांगण (Gauri Patangan) सर्व ठिकाणी अतिक्रमण धारकांचा कब्जा झाल्याचे दिसत होते, मात्र भाविकांना ज्या पूजा साहित्याची गरज होती त्या दुकानदारांना देखील अतिक्रमण धारकांनी दूर फेकले होते.

यामुळे महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण परिसरात पाहणी दौरा केल्यानंतर या पवित्र असणाऱ्या गंगाघाट परिसरात फक्त पूजा साहित्य विक्री करणाऱ्यांना अत्यंत शिस्तीत दुकाने लावण्यासाठी परवानगी मिळणार असून इतर सर्व प्रकारच्या दुकानांना हटविण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरम्यान आज महापालिकेत झालेल्या खाते प्रमुखांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी गंगाघाट परिसराचा आढावा घेत या ठिकाणी अतिक्रमण विभागाने सतत लक्ष ठेवण्याचे सूचना केल्या.

त्याचप्रमाणे दर शनिवारी व रविवारीसह इतर सुट्टीच्या दिवशी देखील या ठिकाणी आपल्या सुरक्षारक्षकांना (Security guard) ठेवण्याचे आदेश दिले. एकही अतिक्रमण (Encroachment) होता कामा नये अशा सूचना करताना जर अतिक्रमण झाले तर या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार असल्याची तंबी महापालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नियोजन करून याठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Related Stories

No stories found.