Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याHijab Row : 'हिजाब'वरून वळसे-पाटलांचा इशारा; म्हणाले...

Hijab Row : ‘हिजाब’वरून वळसे-पाटलांचा इशारा; म्हणाले…

मुंबई | Mumbai

संपूर्ण देशात सध्या हिजाबवादाची (Hijab row) जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने (Agitation) आणि निदर्शने होत आहेत. हिजाबवादावरून सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारचा (State Government) प्रयत्न आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी यासाठी धर्मगुरूंसह तमाम जनतेला आवाहन केले आहे….

- Advertisement -

तसेच हिजाबवादावरून राजकीय पक्षांनी विनाकारण अस्वस्थता निर्माण करू नये. पोलिसांचे काम वाढवू नये, असा इशाराच गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला आहे.

गृहमंत्री वळसे पाटील आज पत्रकार परिषदेत बोलत होते. हिजाब प्रकरणावरून समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी गृहमंत्री वळसे पाटील यांनी पोलीस (Police) दलाला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी मुस्लिम धर्मगुरूंनाही विनंती केली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास

ते म्हणाले की, धर्मगुरूंनी प्रक्षोभक विधाने करू नये. तसेच लोकांच्या भावना भडकवू नयेत. तुमचे जे हक्क आहेत ते आहेतच, मात्र त्याचे विनाकारण भांडवल करणे योग्य नाही. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि राज्यात शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Video : लतादीदी नेहमीच राहतील स्मरणात! नाशिककर भावूक

दरम्यान, ज्या शाळा (Schools) हिजाबला विरोध करतात त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे आंदोलन परभणीत झाले. तसेच जे कट्टरतावादी युवक आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील आंदोलनकर्त्यांनी केली. परभणीत (Parbhani) कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस (Police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एसटी विलिनीकरण अहवालासाठी राज्य सरकारला वाढीव मुदत; हायकोर्टाचे निर्देश

तसेच अमरावतीतही (Amravati) हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. येथे एआयएमआयएम सक्रिय झाला असून या पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना आपले निवेदन दिले.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद मालेगावातदेखील (Malegaon) उमटत आहेत. आज मालेगावातील महिलांनी हिजाब डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी मालेगावातील हिजाब डेला परवानगी दिली नाही. येथील परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

वाईन विक्रीचा वाद हायकोर्टात; राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान

- Advertisment -

ताज्या बातम्या