Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र...तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा : फडणवीस

…तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा : फडणवीस

मुंबई | प्रतिनिधी | Mhada

म्हाडा (MHADA), टीईटी (TET), पोलीस भरती (Police recruitment) हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत आहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता त्याची सीबीआय चौकशी (CBI inquiry) व्हायलाच हवी, अशा मागणीचे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले…

- Advertisement -

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी दोन कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले.

काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच तीन महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील. अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला (CBI) सोपवा, अशी मागणी (Demand) फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या