Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यातुमच्या राज्यात मला जगण्याची इच्छा नाही : अण्णा हजारे

तुमच्या राज्यात मला जगण्याची इच्छा नाही : अण्णा हजारे

अहमदनगर | Ahmednagar

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात सुपरमार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर राज्य सरकारवर (State Government) सर्व स्तरातून टीका होत आहे. आता या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी उद्यापासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता…

- Advertisement -

याबाबत लवकरच ग्रामसभा (Gramsabha) घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राळेगण सिद्धीमध्ये (Ralegan Siddhi) माध्यमांशी संवाद साधताना दारूच्या दुकानात वाईन मिळते, मग सुपरमार्केटमध्ये (Super market) परवानगी देण्याचे काय कारण? असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दारुची दुकाने आहेत, त्यात तुम्ही आणखी वाढवत आहात, तुम्हाला सर्वच लोकांना व्यसनाधीन बनवायचे आहे का?, असा प्रश्न अण्णा हजारेंनी राज्य सरकारला विचारला आहे.

लोक व्यसनाधीन झाले की राज्य सरकारला जे साधायचे असेल ते साधता येईल, म्हणून हा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी यावेळी केली. तसेच बालके जर दारूच्या आणि वाईनच्या (Wine) अधीन गेली तर आपल्या देशाचे काय होईल, अशी चिंता त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले की, मी सरकारला (Government) निरोप पाठवला. मग त्यांची लोकं चर्चेसाठी आली. मी त्यांना फक्त इतकेच म्हटले की तुमचे मी सगळे ऐकले, आता तुम्ही सरकारला माझा एक निरोप पाठवा. तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिलेली नाही.

एक्साईज विभागाचे (Excise Department) आयुक्त मला भेटायला आले. मात्र मला त्यांच्यावर विश्वास नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यात वाईन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करत आहात हे पाहून मला या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या