Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या...ते तर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आंदोलनात

…ते तर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आंदोलनात

मुंबई | Mumbai

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), पडळकर (Gopichand Padalkar) एसटी कर्मचाऱ्यांचा संप भडकवण्याचे काम करत आहेत, असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांनी केला…

- Advertisement -

एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. याबाबत परब यांनी आज माध्यमांशी संपर्क साधला.

अनिल परब म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी मी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना विनंती करतो. कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा रुजू व्हावे.

राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत आहेत त्या पक्षांकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करावे. सदाभाऊ खोत, पडळकर एसटी कर्मचाऱ्यांचा संप भडकवण्याचे काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

करोना काळात एसटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संप असाच सुरु राहिला तर एसटीचे आणखी नुकसान होईल परिणामी कर्मचाऱ्यांचे देखील यात नुकसानच होईल. सरकार चर्चेसाठी तयार आहे. कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत.

परंतु एसटीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आवाहन यावेळी अनिल परब यांनी केले. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हायचे आहे संरक्षण देणार असल्याची माहिती देखील परब यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या