महिला आयोगाकडून त्र्यंबकच्या 'त्या' घटनेची गंभीर दखल

महिला आयोगाकडून त्र्यंबकच्या 'त्या' घटनेची गंभीर दखल

मुंबई । Mumbai

नाशिक जिह्यातील (Nashik district) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) देवगाव शासकीय कन्या आश्रम शाळेतील (Devgaon Ashram School) शिक्षकाने एका बारावीच्या मुलीला (Girl) मासिक पाळी (Menstrual cycle) आल्याने तिला वृक्षारोपण (Plantation) करण्यापासून रोखल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता या घटनेची राज्य महिला आयोगाने (State Women Commission) दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत...

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याबाबतचे पत्र आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) आयुक्तांना (Commissioner) पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील देवगाव शासकीय कन्या आश्रम शाळा येथील शिक्षकाने (teacher) एका विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यामुळे वृक्षारोपण करण्यास मनाई केल्याची घटना घडल्याचे समाजमाध्यमाद्वारे निदर्शनास आले.

महिला आयोगाकडून त्र्यंबकच्या 'त्या' घटनेची गंभीर दखल
तुझ्या हातून लावलेलं झाड जगणार नाही; विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून रोखले

तसेच घडलेली ही सर्व घटना निंदनीय असून पुरोगामी महाराष्ट्रात एका शिक्षकाकडून अंधश्रद्धेस (Superstition) खतपाणी घालून मुलीच्या नैसर्गिक धर्माबाबत न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रकार आहे. या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आयोगास पाठविण्यात यावा, असे निर्देश चाकणकर यांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com