Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआज राज्यसेवा पूर्व परीक्षा

आज राज्यसेवा पूर्व परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 अंतर्गत लेखी परीक्षा आज रविवारी (दि. 21) होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना परीक्षा आयोजनासंदर्भात नियमावली जारी केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षेचे संयोजन केले जात आहे. यापूर्वी वारंवार या परीक्षेला स्थगिती मिळाल्याने उमेदवार मेटाकुटीला आले होते. गेल्या रविवारी (दि. 14) ही परीक्षा होणार होती. परंतु, ऐनवेळी स्थगिती दिल्याने राज्यभर आंदोलने झाली. यानंतर जाहीर केलेल्या सुधारित तारखेनुसार आज रविवारी ही परीक्षा होत आहे. परीक्षा केंद्रांवर करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती ‘एमपीएससी’मार्फत जारी केली आहे.

दरम्यान, रविवारीच रेल्वे विभागाच्याही परीक्षा होत आहेत. अनेक उमेदवारांनी एमपीएससीच्या परीक्षेसोबत रेल्वे भरतीसाठीही अर्ज केले होते. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार गेल्या रविवारी (दि. 14) राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार असल्याने दोन्ही परीक्षांना सामोरे जाणे उमेदवारांना शक्य होते. परंतु आता एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने कुठल्यातरी एका परीक्षेवर उमेदवारांना पाणी सोडावे लागणार आहे.

लक्षणे असलेल्यांसाठी विशेष व्यवस्था

परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे व सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट सर्व उमेदवारांना उपलब्ध करून दिले जाईल. त्याचा वापर दोन्ही सत्रांसाठी करणे अनिवार्य असेल. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान करोनासदृश लक्षणे असलेल्या उमेदवारांनी पर्यवेक्षकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना आगाऊ कळविणे अपेक्षित आहे. अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाउन, मेडिकल शू कव्हर, मेडिकल कॅप आदी बाबी असलेले पीपीई किट उपलब्ध करून दिले जाईल. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था केली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या