Sunday, April 28, 2024
Homeजळगावराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाचोर्‍यात केला राज्य- केंद्र सरकारवर गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाचोर्‍यात केला राज्य- केंद्र सरकारवर गंभीर आरोप

पाचोरा Pachora प्रतिनिधी

सद्या कोणताही राजकीय विषय न्यायालयात (court) चॅलेंज केला जात आहे, आणि न्यायालयच निर्णय देत असल्याने काय बोलावे. निवडणुका वर्षभरावर असतांना  काँग्रेसचे राहुल गांधी यांची खासदारकी कश्या प्रकारे काढण्यात आली !. देशात वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक मंदी यावर कोणीच बोलत नाही, मूळ प्रश्न बाजूला ठेवून प्रसार माध्यमांना हाताशी धरून नको त्या विषयांवर चर्चा घडवून आणल्या जात आहे. देशात लोकशाही धोक्यात (Democracy in danger) आली असल्याचा गंभीर आरोप (allegations) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (State president of NCP,) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते,माजी जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दि.२६ मार्च मंगळवार रोजी धुळे- नंदुरबार-जळगांव खान्देश दौऱ्यावर आले होते. जळगांव ग्रामीणचा दौरा आटोपून ते पाचोरा मार्गे चाळीसगांव जात असतांना रा.काँ.चे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या विनंती वरून त्यांनी श्री.वाघ यांच्या निवासस्थानी धावती सदिच्छा भेटी दिली.

त्यांच्या सोबत माजी मंत्री गुलाबराव देवकर,जिल्हाध्यक्ष ऍड.भय्यासाहेब रवींद्र पाटील,सामाजिक न्याय सेलचे अरविंद मानकर, अशोक लाड वंजारी, विलास पाटील, श्री.चितोडीया,संदीप पाटील आदी जिल्हास्तरीय पदाधिकारी होते. या भेटी दरम्यान प्रदेशाध्यक्ष यांनी पदाधिकारी-कार्यकर्ते यांचे कडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणी, बूथ कमेट्या, पक्ष संघटन आदी विषयांवर माहिती घेऊन सूचना केल्या.

तद्नंतर प्रसार माध्यमांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष, सत्ताधारी -विरोधकातील आरोप प्रत्यारोप, मध्यावधी  निवडणुका,न्यायप्रक्रिया, शेतकरी, समस्या, बजेट विविध विषयांवर प्रश्न विचारले असता ,श्री.पाटील संवादात बोलले कि. सद्या कोणताही राजकीय विषय न्यायालयात चॅलेंज केला जात आहे, आणि न्यायालयच निर्णय देत असल्याने काय बोलावे. निवडणुका वर्षभरावर असतांना  काँग्रेसचे राहुल गांधी यांची खासदारकी कश्या प्रकारे काढण्यात आली !

देशात वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक मंदी यावर कोणीच बोलत नाही, मूळ प्रश्न बाजूला ठेवून प्रसार माध्यमांना हाताशी धरून नको त्या विषयांवर चर्चा घडवून आणल्या जात आहे. देशात लोकशाही धोक्यात आली असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला.

मध्यावधी निवडणूका बाबत म्हणाले कि. राज्याच्या सत्ते संदर्भात न्यायालयाने अपेक्षित निकाल दिल्यास हे सरकार गडगडू शकते.? न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. बाजार समितीच्या निवडणुका पक्ष लढवत नाही स्थानिक स्तरावर नेत्यांनी निर्णय घ्यावा. मात्र विधानसभा,लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका स्वबळावर कि, महाविकास आघाडी तुन लढविल्या जातील हे परिस्थिती पाहून निर्णय होतील. सद्याचे सरकार निवडणुकांना घाबरते.

कोणत्याही निवडणुका होऊ न देता पुढे ढकलत आहे. विविध हेड खाली विकासकामांसाठी बजेट मध्ये १३हजार कोटींची तरतूद असतांना ५०/५४ आणि ३०/५४ या हेड मध्ये सत्ताधारी आमदारांना सुमारे ५०हजार कोटींची कामे वाटप होत आहे.? काम देणं-टेंडर काढणे फक्त घोषणा होत आहे.  ही कामे भविष्यात होतील की नाही याची शास्वती नाही,म्हणून काम घेणाऱ्या ठेकेदारांनी सावध राहून कामें घ्यावी असा उपरोधिक टोला प्रदेशाध्यक्ष यांनी लगावला.

  यावेळी  न.पा.माजी गटनेते, पिटीसी चेअरमन संजय वाघ, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी,  युवती जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, जिल्हा उपाध्यक्ष शालीग्राम मालकर, खलिल देशमुख, नाना देवरे,ललित वाघ, नितीन तावडे, विकास पाटील, भूषण वाघ, रणजित पाटील, बि टी.पाटील, पी डी भोसले, अझर खान, सुनील पाटील, रज्जू बागवान, भागवत महालपुरे, बाबाजी ठाकरे, रा.युवक काँग्रेसचे पदाधिकारी सुदर्शन सोनवणे, ललित पाटील,गणेश पाटील, निलेश पाटील, सचिन पाटील, संतोष पाटील,सुदाम वाघ, भगवान ,माणिक पाटील, सत्तार पिंजारी, अशोक महाजन आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या