बोदवडला भगवा : खडसेंच्या गडाला सुरुंग : पाहा, राज्यातील महत्वाचे निकाल, एका क्लिकवर

बोदवडला भगवा :  खडसेंच्या गडाला सुरुंग : पाहा, राज्यातील महत्वाचे निकाल, एका क्लिकवर

जळगाव : बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा 9 जागांवर मिळवला विजय, राष्ट्रवादी काँग्रेसला 7 तर भाजपला 1 जागा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना एक मोठा धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायतीत पंकजा यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे नेते राजूभाऊ मुंडे यांचा पराभव झाला आहे. एकूण 17 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला तर 3 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीने विजय मिळवला आहे तर भाजपने 8 जागांवर विजय मिळवला आहे.

सिंधुदुर्गातील चार नगरपंचातींपैकी दोन नगरपंचायती भाजपाला राखण्यात यश आले आहे. तर दोन नगरपंचायती गमावल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसने दोन नगरपंचातींमध्ये नारायण राणेंच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.

नंदूरबार : काँग्रेस - 03 विजयी भाजपा - 01 विजयी पालकमंत्री के सी पाडवी यांना मतदार संघातच धक्का, काँग्रेसला अवघ्या तीन जागा

नंदूरबार : धडगाव नगर पंचायत एकूण जागा - 17 शिवसेना - 13 विजयी

राज्याचे लक्ष लागलेल्या  बोदवड नगरपंचायतीत एकनाथ खडसे यांची आगेकूच सुरु आहे. राष्ट़्रवादीने तीन जागांवर आघाडी घेतली असून शिवसेनेने दान जागा मिळवल्या आहेत.

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा धक्का बसला. शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकूण 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवला.

दापोली नगरपंचायतीमध्ये रामदास कदमांना धक्का बसला आहे. यात अनिल परबांची सरशी झाली आहे. दापोली नगरपंचायतीच्या ८ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. ७ जागांवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रसेचे उमेदवार विजयी झाले.

औरंगाबादच्या सोयगाव नगरपंचायतचे निकाल स्पष्ट झाले असून, शिवसेनेने भगवा फडकवत भाजपचा पराभव केला आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना धक्का देत सत्ता सोयगाव नगरपंचायतची सत्ता ताब्यात मिळवली आहे. एकूण 17 जागांपैकी 9 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेला बहुमत मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे 23 वर्षांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीत बाजी मारल्याचे दिसत आहे. या ठिकाणी 17 पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. या ठिकाणी रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी, कॉग्रेस व मित्रपक्षांनी एकुण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com