स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचं बिगुल वाजलं? राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचं बिगुल वाजलं? राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे संकेत

मुंबई | Mumbai

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत (Maharashtra Local Body Elections) आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेले अनेक दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी असल्याचे बोलले जात होते. मात्र आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका (Local Body Elections In September Or October) घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक भावी उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट पाहत आहेत. अशातच या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commision) एका राजपत्रामध्ये निवडणुकीचा उल्लेख केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचना देण्यात आल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचं बिगुल वाजलं? राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे संकेत
Sharad Pawar : येवला वगळता शरद पवारांचे सर्व दौरे रद्द; 'हे' आहे कारण

दरम्यान, मुंबई-पुण्याह राज्यातील ११ महापालिकांची मुदत गेल्या वर्षी १५ मार्च रोजी संपली आहे, तसेच ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असल्याने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिकांसह जिल्हा परीषदेसोबत नगर पंचायतींच्या निवडणुका ही रखडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा अद्याप प्रलंबित निकाल लागला नाही, तर राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुनावण्या सुरु आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आधी कोरोनामुळे, नंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे आणि सत्तांतरामुळे रखडल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कालावधी मुदत संपल्यानंतर जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत लांबवता येऊ शकता मात्र त्यानंतर निवडणुका घ्याव्याच लागतात. मात्र आता गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे कारभार प्रशासकांच्या हाती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचं बिगुल वाजलं? राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे संकेत
ठाकरेंना पुन्हा धक्का? विधान परिषदेतील बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे. ५ जुलै २०२३ रोजी काढलेले हे परिपत्रक आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे म्हटले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com