आजपासून राज्यस्तरीय अ‍ॅम्सकॉन परिषद

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आयएमए नाशिकरोडच्या ( IMA- Nashikroad )संयुक्त विद्यमाने आयएमए अ‍ॅकेडमी ऑफ मेडिकल स्पेशलिटीज विंगच्या (IMA Academy of Medical Specialties Wing) वतीने अ‍ॅम्सकॉन-2022 ही राज्यस्तरीय परिषद दि. 23 व 24 जुलै रोजी डॉ. एच. एस. जोशी सभागृह, आयएमए, शालिमार, नाशिक येथे आयोजित केली आहे, अशी माहिती नाशिक आयएमएच्या अध्यक्ष डॉ. राजश्री पाटील( Dr. Rajshree Patil ) (ऑर्गनायझिंग चेअरमन अमस्कॉन 2022), नाशिकरोड आयएमए अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा (ऑर्गनायझिंग को-चेअरमन अमस्कॉन 2022), नाशिक सचिव डॉ. विशाल पवार व नाशिकरोड आयएमए सचिव डॉ. रेशमा घोडेराव यांनी दिली.

ही परिषद राष्ट्रीय स्तरावर आयएमएच्या सर्व मेडिकल शाखांच्या विशेषज्ञांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. डॉ. प्रशांत भुतडा यांनी अमस्कॉन 2022 अंतर्गत होणार्‍या परिसंवादाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या राज्यस्तरीय परिषदेचा मान यंदा नाशिकला मिळाला असून मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, कर्करोग, मानसरोग तसेच इतर असंसर्गिक आजारांविषयी उहापोह या परिषदेत होणार आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून एक हजार डॉक्टरांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे.

आयएमएचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, आयएमए महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. मंगेश पाटे, आयएमए महाराष्ट्र राज्याचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, आयएमए एएमएसचे राज्यस्तरीय चेअरमन डॉ.स्नेहल फेगडे, आयएमए एएमएसचे राज्यस्तरीय सचिव डॉ.हेमंत सोननीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नाशिक शहरातील नामवंत डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. मनोज चोपडा, डॉ. तुषार गोडबोले, डॉ. अजित कुमठेकर, डॉ. यशपाल गोगटे आदी मधुमेह व रक्तदाब याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम परिषद यशस्वी पार पडण्यासाठी डॉ. गीतांजली गोंदकर, डॉ. किरण शिंदे, डॉ. माधवी मुठाळ, डॉ. पंकज भट, डॉ. सागर भालेराव, डॉ. अनिता भामरे, डॉ. शलाका बागुल, डॉ. मिनल रणदिवे, डॉ. स्मिता दहेकर, डॉ. नितीन वाघचौरे, डॉ. दिलेश भारंबे डॉ. मयूर सरोदे आदी प्रयत्नशील असल्याची माहिती डॉ. विशाल पवार यांनी दिली. याप्रसंगी डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. ए. के. पवार, डॉ. शिरीष देशपांडे आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *