
मुंबई | Mumbai
राज्यातील हजारो विद्यार्थी, नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली आहे.
करोना (COVID19) काळात कलम १८८ अंतर्गत (IPC 188) अंतर्गत विद्यार्थी, नागरिकांवर टाकलेले गुन्हे महाराष्ट्र गृह विभाग मागे घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलतांना दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या काळात ज्या नागरिंक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वत: १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल.