Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याबुस्टर डोसबाबत केंद्रापाठोपाठ राज्याने घेतला 'हा' निर्णय

बुस्टर डोसबाबत केंद्रापाठोपाठ राज्याने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | Mumbai

देशात करोना रुग्णांमध्ये (Corona Patients) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बुस्टर डोसबाबत केंद्र सरकारने (Central Government) काल मोठा निर्णय घेतला होता…

- Advertisement -

उद्यापासून सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनेही (State Government) १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्याची घोषणा केलेली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.

या ७५ दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या