Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या...तर राज्य सरकारला धारेवर धरू; नितेश राणेंचा इशारा

…तर राज्य सरकारला धारेवर धरू; नितेश राणेंचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेबद्दल गळे काढण्यापूर्वी राज्यातील हिंदू देवदेवतांची होणारी विटंंबना थांबवा, असे आवाहन करुन आ. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज नाशिकमधील (Nashik) देवतांच्या विटंंबनेबद्दल त्वरीत कारवाई न झाल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) राज्य सरकारला (State Government) धारेवर धरले जाईल, असा इशारा दिला…

- Advertisement -

इंदिरानगर हद्दीत एका समाजकंंटकाने सोशल मिडीयावर देवतेची विटंबना करणारी पोस्ट व्हायरल केली. याबाबत संबंधित संशयिताविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याचा आरोप करुन राणे यांच्या नेतृत्वाखाली हिुंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.

त्यानंतर आ. देवयानी फरांदे (Devayani Farande) सीमा हिरे (Seema Hire) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) निवेदन दिले. त्यानंंतर ते पत्रकारांशी बोलत होेते. यावेळी लक्ष्मण सावजी (Laxman Sawaji) शहराध्यक्ष गिरीश पालवे (City President Girish Palve) उपस्थित होते.

यावेळी राणे पुढे म्हणाले की, प्रत्येत भाषणात आपले हिंदुत्व सिध्द करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उध्दव् ठाकरे (CM Uddhav Thackeray) करतात. तरी सुध्दा हिंंदु देवतांची विंटंंबन करण्याची हिंमत कशी होते. त्यांना पोलिस (police) कसे काय पाठीशी घालू शकता.

इंदिरानगर (Indiranagar) मधील घटनेनंतर कार्यकर्ते (Activists) संंतप्त झाले होते. त्यांनी पोलिसांना निवेदन दिले. मात्र कारवाई झाली नाही. म्हणूनच आज मोर्चाचे (Front) आयोजन करावे लागले. या मोर्चानंंतर तरी ठोस कारवाई करा, आरोपी पकडा त्याच्या मागे कोणाचा हात आहे ते तपासा. अन्यथा आजचा मोर्चा शांततेत झाला. मात्र या पुढे ती अपेक्षा ठेवू नका, तसेच करावाई न झाल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात आम्ही ठाकरेे सरकारला याबाबत जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. असे ते म्हणाले.

तसेच राज्यसभा (Rajyasabha) सदस्य निवडणुकीवरून आमदारांना (MLA) नजरकैदेत ठेवण्याच्या घटनेबद्दल त्यांनी खिल्ली उडवली. ज्या शिवेसेनेच्या (Shivsena) नजरेला पूर्वी घाबरत होते. त्यांनाच आता कोंडून ठेवण्याची वेळ येत आहे. ही वेळ शिवसेनेवर का आली याचे आत्मपरीक्षण शिवसेनेने करावे असेही ते म्हणाले.तसेच हिंदूत्व केवळ भाषणातून बोलण्यापेक्षा ते कृतीतून सिध्द् करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या