राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; घेतला 'हा' मोठा निर्णय

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; घेतला 'हा' मोठा निर्णय
जुने नाशिक परिसरात घराला आग

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अवकाळी पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणे आता शक्य होणार आहे.

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; घेतला 'हा' मोठा निर्णय
यंदा पाऊस कसा राहणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

त्याबरोबरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतीचे अचूक पंचनामे (Panchnama) केले जावेत यावर देखील चर्चा करण्यात आली. तसेच आतापर्यत ३१ कोटींच्या नुकसानीचे पंचनामे होऊन सरकारकडे आले असून त्याचाही सहानुभूतीने विचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; घेतला 'हा' मोठा निर्णय
"तुमचं खरं काडतूस..."; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे

१) शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित

२) ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद

३) नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार

४) देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल

५) सेलर इन्स्टिट्यूट 'सागर' भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण

६) महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी

७) अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता

८) नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता 'परिस स्पर्श' योजना

९) अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com