एसटी संपाविरोधात राज्य सरकार आक्रमक; सेवकांवर निलंबनाची कारवाई

376 एसटी सेवकांचे निलंबन
एसटी संपाविरोधात राज्य सरकार आक्रमक; सेवकांवर निलंबनाची कारवाई

मुंबई / नाशिक । प्रतिनिधी Nashik/ Mumbai

उच्च न्यायालयाचा High Court मनाई आदेश झुगारून संप सुरूच ठेवणार्‍या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेविरोधात राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच एसटी महामंडळ प्रशासनाने MSRTC Administration आता संपकरी कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून 16 विभागांतील 45 आगारांमधील 376 कर्मचार्‍यांवर निलंबनाची MSRTC Employees Suspended कारवाई करण्यात आली आहे. त्यात कळवणच्या 17 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मात्र कर्मचारी संपावर ठाम असल्याने संप सुरूच असून त्यामुळे खासगी वाहतूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे.

राज्यभरातील 16 विभागांतील 45 आगारांमधील 376 एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये नाशिक विभागातील कळवण आगारातील 17 कर्मचारी, वर्धा विभागातील वर्धा आणि हिंगणघाट आगारामधील 40 कर्मचारी, गडचिरोली विभागातील अहेरी,

ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील 14 कर्मचारी, चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, विकाशा आगारातील 14 कर्मचारी, लातूर विभागातील औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर, लातूर आगारातील 31 कर्मचारी, नांदेड विभागामधील किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलूर आगारातील 58 कर्मचारी,

भंडारा विभागामधील तुमसर, तिरोडी, गोंदिया आगारामधील 30 कर्मचारी, सोलापूर विभागातील अक्कलकोट आगारामधील 2 कर्मचारी, यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील 57 कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-1 आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील हिंगाली व गंगाखेड आगारातील 10 कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील 16 कर्मचारी, नागपूर विभागामधील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमाननगर आगारातील 18 कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलूस, इस्लामपूर,आटपाडी आगारातील 58 कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

या संपामुळे कालपासून बसेस बंद झाल्या आहेत. कर्मचारी विभागीय कार्यालया समोर धरणे धरुन बसत आहेत. अधिकृत संघटना फक्त आम्ही संंपात नाही, पोलिसांनी संरक्षण दिले तर गाडी चालवू असे सांंगत आहेत. मात्र एकही गाडी रस्त्यावर येत नाही. ऐन दिवाळीच्या सणात राज्य परिवहन महामंडळाच्या सेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एसटी कामगारांंचा आतापर्यंत झालेले अतोनात छळ व अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करणारे एसटी कर्मचारी शासनाच्या या धोरणाला अतिशय वैतागले असून या कर्मचार्‍यांंच्या अनेक समस्या असतांना शासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्याचा उद्रेक म्हणून कोणत्याही संघटनेचे नेतृत्व न स्वीकारता फक्त कर्मचारी म्हणून त्यांनी हा संप संपूर्ण महाराष्ट्रात पुकारला असल्याच आरोप करुन त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शवला आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाविरोधात न्यायालायने आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतरदेखील काही संघटनांनी, एसटीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर आहे, असे जाहीर केलेले आहे. हे जाहीर केल्यानंतर देखील हा संप सुरू असल्याचे काल आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने सूचना केली की, याबाबत तुम्ही अवमान याचिका दाखल करू शकतात. म्हणून एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे.

अनिल परब, परिवहनमंत्री

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com