राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत जिल्हा दौर्‍यावर

डहाळेवाडी विद्युत उपकेंद्राचे आज लोकार्पण
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत जिल्हा दौर्‍यावर
USER

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Maharashtra Energy Minister Dr. Nitin Raut )गुरुवारी (दि.12) नाशिक जिल्हा दौर्‍यावर येणार असून सकाळी 11 वाजता त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar ) तालुक्यातील डहाळेवाडी ( Dahalewadi ) येथील 33/11केव्ही विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

डहाळेवाडी विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून कृषिमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आ. हिरामण खोसकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यासोबतच एकलहरे औष्णिक केंद्र येथे ऊर्जामंत्री भेट देणार असून तीनही कंपन्यांतील कार्याचा आढावा घेणार आहेत. डहाळेवाडी येथील विद्युत उपकेंद्र लोकार्पण कार्यक्रमाला या भागातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महावितरण विभागाने केले आहे.

Related Stories

No stories found.