नाशिक | प्रतिनिधी

राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा २७ डिसेंबर राेजी घेतली जाणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेची तारीख जाहीर झाली असून वेळापत्रकानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ही सेट परीक्षा होणार आहे...

सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी होते. यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जून रोजी होणार होती. मात्र कराेना आणि त्यामुळे जाहीर झालेला लॉकडाऊन यामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. ज्या उमेदवारांनी सेट परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते अधिकृत संकेतस्थळावर जाऊन परीक्षेसंदर्भातील माहिती, वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात. विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे की, 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा २८ जून २०२० रोजी होणार होती.

मात्र आता ही परीक्षा २७ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व माहितीसाठी उमेदवारांनी http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी.