राज्य निवडणूक आयोगाचा ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठा निर्णय

राज्य निवडणूक आयोगाचा ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीची निवडणुक (Gram Panchayat Election) घेण्याची घोषणा ९ नोव्हेंबर २०२२ ला राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) केली होती. त्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्वच इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, निवडणूक आयोगाची वेबसाईट (Website)चालत नसल्याने राज्यभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती...

त्यानंतर आता निवडणूक आयोगाने विशेष आदेश जारी करत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचा आदेश मागे घेत ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. या आदेशात दुरूस्ती करत नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान (State Election Commissioner U.P.S.Madan) यांनी दिली आहे.

दरम्यान, अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. तर या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com