Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यारोशनी शिंदे मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली दखल; पोलिसांना दिले 'हे'...

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली दखल; पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई | Mumbai

ठाण्यातील (Thane) ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद सगळीकडे चांगलेच उमटले आहेत. या घटनेनंतर काल ठाकरे गटाने ठाण्यात मोठा मोर्चा काढून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. यानंतर आता रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे…

- Advertisement -

Padma Shri Awards 2023 : राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

याबाबत अधिक माहिती अशी की, रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिले आहेत. फेसबुक या समाजमाध्यमावर पोस्ट केल्याचा राग धरून रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

RBI कडून रेपो रेट जाहीर; तुमच्या EMI वर काही परिणाम होईल का? वाचा सविस्तर

दरम्यान, महिला आयोगाच्या आदेशानंतर कासारवडवली पोलीस ठाण्याचे (Kasarvadvali Police Station) पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये जाऊन अहवाल सादर केला. त्यानंतर आज संध्याकाळी महिला आयोग एक पत्रक काढून यावर आपली भूमिका मांडणार आहे. तसेच या अहवालात सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नसल्याचे महिला आयोगाने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या