
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत ( Corona Patients )मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे.
राज्य मंत्रिमंडळाची ( Meeting of State Cabinet )आज सोमवारी बैठक होणार आहे. बैठकीत करोना नियमावलीबाबत चर्चा होणार आहे. राज्यात एकाएकी झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याने भितीचे वातावरण आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि नियमावली यावर चर्चा होणार असल्याचे समजते. बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.