सोयाबीन बियाणांची टंचाई : घरीच करा पाच लाख क्विंटल बियाणे

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक
सोयाबीन बियाण्यांमध्ये पुढील हंगामात पुन्हा अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान पाच लाख क्विंटल बियाणे घरीच तयार करण्याबाबतचे उद्दिष्ट कृषी खात्याने निश्चित केले आहे.

‘‘बियाणे बाजारावर शेतकऱ्यांनी कमीत कमी अवलंबून राहावे, असा प्रयत्न कृषी विभागातर्फे सुरू आहे. त्यामुळे पाच लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी घरीच तयार केल्यास किमान ३०० कोटी रुपयांची बचत देखील होईल,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
वराज्यात ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो.अब्जावधी रुपयांचे उलाढाल घडवून आणणारे सोयाबीन आता कापसाप्रमाणेच खरिपाचे मुख्य पीक बनले आहे. मात्र, बियाणे कंपन्यांकडून निकृष्ट दर्जाच्या बियाण्याचा पुरवठा झाल्याने यंदा ६० हजारापेक्षा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. यामुळे कृषी खात्याने बियाणे कंपन्यांवर कारवाई देखील सुरू केली आहे.

‘‘कारवाई, वाद यापेक्षा शेतकऱ्यांना अन्य पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी घरचे बियाणे वापरणे हाच उत्तम पर्याय आहे. हेक्टरी ७५ किलो बियाण्यांचा वापर गृहीत धरल्यास ३० लाख क्विंटल बियाणे दर खरिपाला लागते. यातील २० लाख क्विंटल बियाणे शेतकरी स्वतःचेच वापरतात,’’ असे गुणनियंत्रण विभागातर्फे सांगितले जात आहे.२५ ते ३० लाख क्विंटलपैकी १५ ते २० लाख क्विंटल बियाणे शेतकरी स्वतःकडील वापरतो व उर्वरित १० ते १२ लाख क्विंटल बियाणे बाजारातून विकत घेतले जाते. ‘‘पुढील हंगामात शेतकऱ्याने महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून एकूण पाच लाख क्विंटल बियाणे विकत घ्यावे. मात्र, खासगी बाजारातील बियाणे पाच लाख क्विंटलच्या पुढे जाऊ नये असा प्रयत्न असल्याचे गुणनियंत्रण विभागातर्फे सांगितले जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *