Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-पुणे रेल्वे भूसंंपादनाला मुहूर्त

नाशिक-पुणे रेल्वे भूसंंपादनाला मुहूर्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या Nashik-Pune Semi High Speed ​​Railway दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत Land Acquisition संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत आज पूर्ण झाले. या रेल्वेमार्गाचा उपयोग पुणे-नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांसाठी होणार आहे.

- Advertisement -

या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि स्मिता चंद्रकांत कोलते यांचा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन क्र. 4 च्या उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे-फडतरे, रेल्वेचे सहमहाव्यवस्थापक सागर अग्रवाल, सहमहाव्यवस्थापक व्ही. के. गोपाल उपस्थित होते.

पुणे व नाशिक जिल्ह्यातील कृषीमाल वाहतूक, मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी अशाच प्रकारे शेतकर्‍यांचा पुढाकार आवश्यक आहे. शेतकर्‍यांना जमिनीसाठी योग्य मोबदला मिळत आहे, असा संदेश आजच्या खरेदीखतातून गेला आहे. झालेले खरेदीखत हे हवेली तालुक्यातील पेरणे गावातील असून प्रकल्पात समावेश असलेल्या तीनही जिल्ह्यांतील हे पहिले खरेदीखत आहे.

महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.मार्फत या रेल्वेमार्गाचे बांधकाम होणार आहे.

पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा रेल्वेमार्ग जाणार आहे. जिल्ह्यात प्रकल्पासाठी भूसंपादन करावयाच्या गावांपैकी 37 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरित प्रकरणात मोजणी प्रक्रिया, मूल्यांकन टिपणी सहाय्यक नगररचना कार्यालयाकडे पाठवणे आदी प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकल्पासाठी खासगी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येत आहे.

जमिनीसाठी रेडीरेकनरच्या पाचपट दर देण्यात येत असून इमारत तसेच इतर बांधकामे, झाडे आदींसाठी मूल्यांकनाच्या अडीच पट रक्कम दिली जाणार आहे. या रेल्वेमार्गाचा उपयोग पुणे, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांसाठी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या