नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करा

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश
नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करा
USER

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

दमणगंगा आणि एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची ( River Linking Project ) कामे त्वरीत सुरु करावीत, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील ( Water Resources Minister Jayant Patil) यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ( Assembly Vice President Narhari Jhirwal )यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी झिरवाळ यांनी योजनेसंदर्भात क्षेत्रिय स्तरावरील तांत्रिक बाबीबद्दल काही महत्वाच्या उपाययोजना सूचविल्या. ज्यामुळे या प्रकल्पाची किंमत कमी होऊ शकेल असे सांगितले.त्यासंदर्भात विभागाने प्रशासकीय मान्यता आणि इतर बाबींकरीता प्रस्ताव त्वरीत सादर करावे, असे निर्देश जयंत पाटील यांनी दिले.

या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल. तसेच सिंचनात वाढ होईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) हा राष्ट्रीय जलविकास अभिकरण (एनडब्ल्युडीए) नवी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून हे काम प्रगतीपथावर आहे. सप्टेंबर 2021 अखेर अहवाल जलसंपदा विभागास सादर होऊ शकेल, अशी माहिती अधीक्षक अभियंता अ.रा.नाईक यांनी यावेळी दिली.

यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) ए.एन.मुंडे, मुख्य अभियंता नाशिक प्रादेशिक विभाग, डॉ.संजय बेलसरे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com