ब्रॉडगेज मेट्रो सुरू करा

खासदार गोडसे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
ब्रॉडगेज मेट्रो सुरू करा

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिक-लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या जनभावना विचारात घेऊन नागपूर ते चंद्रपूर रेल्वेमार्गाच्या धर्तीवर नाशिक-कल्याण आणि नाशिक-भुसावळदरम्यान ब्रॉडगेज मेट्रो Broadgauge Metro सुरु करावी, अशी आग्रही मागणी खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव Union Minister Ashwini Vaishnav यांच्याकडे केली आहे. आपल्या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही वैष्णव यांनी खा. गोडसे यांना दिली.

नाशिक-कल्याण Nashik- Kalyan या दरम्यानचा प्रवास दोन तासांचा व्हावा आणि नाशिक-जळगाव या दोन जिल्ह्याचा प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना गती मिळावी म्हणून खा. गोडसे यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली.

नाशिक-कल्याण हे अंतर दोन तासांचे झाल्यास मुंबईला कमीत-कमी वेळेत पोहचणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या व्यवसायांना मोठी चालना मिळू शकेल. यादरम्यानच्या लोकलसेवेसाठी खा. गोडसे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. दोन वर्षांपूर्वी खा. गोडसे यांच्या प्रयत्नातून ईएसयूची चाचणी नाशिक-कल्याणदरम्यान घेण्यात आली होती.

मात्र कसारा ते इगतपुरीदरम्यान घाट व बोगद्यामुळे मोठे अडथळे येत आाहेत. बँकर लावूनही हवी तशी ताकद मेमूच्या इंजिनला मिळत नसल्याने अखेर नाशिक-कल्याण लोकलसेवेला ब्रेक लागला. यातून मार्ग काढण्यासाठी इमूऐवजी मेमू मेट्रोचा प्रस्तावदेखील शासनाच्या विचाराधीन आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खान्देशवासीय नागरिक कामानिमित्त वास्तव्यास असल्याने नाशिक-भुसावळदरम्यान जलद रेल्वे सुरु करावी, अशी मागणी खा. गोडसे यांच्याकडे होत आहे.

नाशिक, मुंबई आणि पुणे हे अंतर अवघे दोनशे किलोमीटरचे आहे. या तिन्ही शहरांना विकासाचा सुवर्ण त्रिकोण समजला जातो. मुंबई-पुणे या शहरांची कनेक्टिव्हीटी अतिजलद असल्याने या शहरांचा विकास झपाट्याने झाला. मात्र त्या तुलनेत मुंबई-नाशिक दरम्यानची कनेक्टिव्हीटी जलद नसल्याने नाशिक शहराचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही. नाशिक-कल्याण लोकलसेवा हा जलद कनेक्टिव्हीसाठीचा महत्त्वपूर्ण पर्याय आहे.

मात्र इगतपुरी-कसार्‍यातील घाट आणि बोगद्यांमुळे विविध तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने इमू लोकलची चाचणी अयशस्वी झाली आहे. अशीच परिस्थिती नागपूर-चंद्रपूर विभागातील रेल्वेमार्गावर असल्याने या परिस्थितीवर मात करण्यासाठी तेथे बॉडग्रेज मेट्रोचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्याच धर्तीवर नाशिक-कल्याण आणि नाशिक-भुसावळदरम्यान ब्रॉडगेज मेट्रो सेवा सुरु करण्याची मागणी पुढे आली आहे.

नाशिकसाठी ‘वंदे भारत’ची सेवा

खा. हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन नाशिक-कल्याण आणि नाशिक-भुसावळ दरम्यानच्या ब्रॉडगेज सेवेसंदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान रेल्वे मंत्रालयाकडून सुरु असलेली ‘वंदे भारत’ या विशेष रेल्वेविषयीदेखील खा.गोडसे यांनी विचारणा केली. तेव्हा नाशिकसाठीदेखील ‘वंदे भारत’ रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.