नाशिकहुन 'या' शहरांसाठी विमान सेवेस प्रारंभ

नाशिकहुन 'या' शहरांसाठी विमान सेवेस प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंडिगो कंपनीची (Indigo Company) विमान सेवा (Aviation services) ओझर विमानतळावरून (Ozar Airport) आजपासून सुरू होत आहे.

इंडिगोच्यावतीने गोवा (Goa), अहमदाबाद (Ahmedabad), नागपूरसह (Nagpur) हैदराबाद (Hyderabad) या शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे. त्यासोबतच देशाच्या सुमारे 15 ते 20 शहरांना हॉपिंग लाईटच्या (Hopping light) माध्यमातून सलग्न सेवा देण्याचे नियोजनही केले आहे. आज इंडीगोचे विमान नागपूरवरुन विमान नाशिकला येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्पाईसजेट विमान कंपनीची (Spicejet Airlines) नाशिक - नवी दिल्ली (New Delhi) आणि नाशिक- हैदराबाद या शहरांसाठी सेवा सुरू होती. त्यासोबतच मागिल तीन वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या इंडिगो विमान कंपनीने नाशकातून विमान सेवा सूरू करण्याबाबत उत्सूकता दाखवली होती. इंडिगो कंपनी फक्त नाशिकहून निर्धारित शहरांसाठी सेवा देतानाच इतर शहरांना जोडणारी हॉपिंग सेवा देखील उपलब्ध करून देणार आहे.

त्यामुळे इंडीगोच्या माध्यमातून देशभरातील प्रमुख शहरांसाठी विमान सेवा (Aviation services) उपलब्ध होणार आहे. इतर शहराच्या विमानाचे वेळापत्रक जोडूनच ग्राहकांना नाशिकहून थेट त्या शहराचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडिगो कंपनीच्या पदार्पणामुळे नाशिक शहर देशाच्या अनेक शहरांशी जोडले जाणार आहे. इंडिगो कंपनीच्या वेळापत्रकानुसार हैदराबाद हुन सकाळी 7.10 निघून सकाळी 9.10 वा विमान नाशिकला पोहोचणार आहे.

नाशिकहुन सकाळी 9.30 निघून सकाळी 11.20वा. गोवाला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात गोवा येथून सकाळी 11 40 वाजता निघून दुपारी 1.35 वाजता नाशिक येथे , पोहोचणार आहे. दुपारी 1. 55 वाजता नाशिकहून निघून अहमदाबादला 3.20 वा पोहोचणार आहे. अहमदाबाद अजून 3.40 ला निघून 5.05 वाजता नाशिकला पोहोचणार आहे तर नाशिकहून 5. 25 वाजता निघून नागपूर येथे 7.15 ला पोहोचणार आहे नागपूरहून 7.35 ला निघून रात्री 8:25 ला नाशिकला परत येणार आहे नाशिक येथून रात्री 8:45 ला निघून रात्री 11:40 वाजता हैद्राबाद येथे पोहोचणार आहे.

सलग्न शहरांसांठी सेवा

इंडिगो कंपनी तर्फे विविध शहरांना जोडणारी हॉपिंग फ्लाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे नाशिक बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, इंदौर, कोलकत्ता, तिरुअनंतपुरम ही सर्व विमाने व्हाया अहमदाबाद जाणार आहेत. तर नाशिकहून जयपूर, भोपाळ, भुवनेश्वर,कानपूर, कोझिकोडे, लखनऊ, ओल्ड पोर्ट ब्लेअर,मंगळुरू,राजमुद्री, सुरत, तिरुपती ही सर्व शहरे विमान सेवेद्वारे व्हाया हैदराबाद उपलब्ध केली जाणार आहेत. इंडिगो कंपनीने तीन शहरांना जोडण्याची सुविधा जरी उपलब्ध केली असली तरी त्या माध्यमातून देशभरातील विविध शहरांना जोडणारी थेट तिकिटे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना कनेक्टेड फ्लाईट सेवा मिळणार आहे त्यामुळे विविध शहरांना जाण्याचा प्रवास अधिक सुकर होण्याची शक्यता आहे

आजपासून इंडिगो कंपनीकडून नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा सुरु केली जाणार आहे.त्यातील पहिले विमान नागपूरहुन नाशिकला येणार आहे. पूढे नाशिकहुन ते गोव्याला जाईल, गोव्याहुन परतल्यावर नाशिकहुन तेच विमान अहमदाबादला जारार आहे. रात्री नाशिकहुन पून्हा नागपूरनाशिक व शेवटी हैद्राबदला परतणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com