हॅलोवीन पार्टीत मृत्यूचा तांडव, १५१ जणांचे गेले प्राण; नेमकं काय घडलं?

हॅलोवीन पार्टीत मृत्यूचा तांडव, १५१ जणांचे गेले प्राण; नेमकं काय घडलं?

दिल्ली | Delhi

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हॅलोविन पार्टीदरम्यान पार्टीत मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला असून १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक गंभीर जखमी झालेत.

करोनानंतर या हॅलोविन पार्टीचे आयोजन करण्यात आल्यामुळे यामध्ये मोठ्या संख्येने आणि उत्साहात नागरिक सहभागी होत आहेत. पण शनिवारी रात्री या पार्टीमध्ये चेंगराचेंगरी (Halloween Stampede) झाली आणि यामध्ये १५१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या चेंगराचेंगरीमध्ये १५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आणि ५० जणांना हार्ट अटॅक (Heart Attack) आला. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यूं सुक येओल यांनी एक निवेदन जारी करून अधिकाऱ्यांना जखमींवर लवकर उपचार करण्याच्या आणि पार्टीच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी आरोग्य मंत्रालयाला आपत्ती वैद्यकीय सहाय्य पथके तैनात करण्याचे आणि जखमींच्या उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात बेड सुरक्षित करण्याचे निर्देश दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com