राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत चेंगराचेंगरी

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत चेंगराचेंगरी

वाशिम | washim

खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नुकतीच महाराष्ट्रातून (Maharashtra) जात आहे. महाराष्ट्रातील यात्रेचा आज नववा दिवस आहे. आता भारत जोडो यात्रा वाशिम (Washim) जिल्ह्यात दाखल झाली आहे. आज सकाळी वाशिमला मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे....

भारत जोडो यात्रेत पायी चालणारा एक यात्री वाशिम जिल्ह्यातील राजगाव परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत चेंगराचेंगरी
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पदयात्रेला हिंगोली तालुक्यातील फाळेगाव फाटा येथून सुरुवात झाली. आज दुपारी वाशिम तालुक्यातील बोराळा येथे विश्रांती तर रात्रीचा मुक्काम वाशिम येथे असणार आहे. राजगांवच्या मराठवाडा-विदर्भ सीमेवर यात्रेचे पारंपारिक मराठी संस्कृतीनुसार जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत चेंगराचेंगरी
व्हॉट्सअ‍ॅपचे 'कम्युनिटी फिचर' म्हणजे नेमके काय? कसा कराल वापर? जाणून घ्या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com