एसटी संपाचा आठवा दिवस : आंदोलन कायम, चर्चेच्या फेऱ्या सुरुच

एसटी संपाचा आठवा दिवस : आंदोलन कायम, चर्चेच्या फेऱ्या सुरुच

एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 8 दिवसांपासून कामबंद आंदोलन (St Workers Strike)करता आहेत. मागील 8 दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर शासनानं निलंबनाची कारवाई केल्यानं संपकरी आणखी संतापले आहेत. दरम्यान, आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यांशी चर्चा होणार आहे.

एसटी संपाचा आठवा दिवस : आंदोलन कायम, चर्चेच्या फेऱ्या सुरुच
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

एसटी महामंडळाच्या (ST Corporation) कर्मचार्‍यांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे (State Government Employees) वेतन (Salary) देण्यासाठी राज्य सरकार (state government) सकारात्मक आहे. त्यासाठी अभ्यास करून निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी शनिवारी एसटी कामगार संघटनांच्या (ST workers unions) प्रतिनिधींना दिले आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी मागणी मान्य होईपर्यंत संप कायम राहणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.