एसटी संपावरुन सरकारकडून पहिली कारवाई, कर्मचारी संतप्त

एसटी संपावरुन सरकारकडून पहिली कारवाई, कर्मचारी संतप्त
एस. टी कर्मचारी आंदोलन करताना

राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या (st workers strike)विलिनिकरणाची मागणी वगळता सर्वच मागण्या मान्य केल्या. त्यासंदर्भातील जीआरही काढला. परंतु त्यानंतर संप (st workers strike)मागे घेण्यास कर्मचारी संघटना तयार नसल्यामुळे शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेविरोधात अवमान उच्च न्यायालयात (high court)याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे संपकरी एसटी कामगारांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. चंद्रपूरात १४ संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं प्रशासनाने निलंबन केलं आहे.

एस. टी कर्मचारी आंदोलन करताना
अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या ३ घटकातील १४ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. आयुष्यभर शिस्तीत सेवा केल्याचं फळ सरकारने दिल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची धार कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करून संप सुरूच ठेवणाऱ्या संघटना आणि कर्मचाऱ्यांविरोधात एसटी महामंडळाला अवमान याचिका दाखल करण्याची सूचनाही न्यायालयाने केली. त्याचवेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनीही संपकऱ्यांना इशारा दिला आहे. न्यायालयाचा अवमान करु नका. अन्यथा याचिका दाखल होऊ शकते, असे ते म्हणाले. अवमान याचिकेसाठी कागदोपत्री प्रक्रिया आज पूर्ण होऊ न शकल्यानं आज अवमान याचिका दाखल होऊ शकली नाही. त्यामुळं बुधवारी, सकाळी १० वाजता मुंबई हायकोर्टात अवमान याचिका दाखल करणार आहे. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढं उद्या एसटी संपाच्या प्रश्नावर सुनावणी होणार आहे. त्याचवेळी अवमान याचिका सर्व संबंधित कागदपत्रांसह दाखल करून उद्याच तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती हायकोर्टाला करण्यात येणार आहे, अशी माहिती एस.टी. महामंडळाच्या वकिलांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com