ST Workers Strike : राज्य सरकारकडून बडतर्फीचं हत्यार

ST Workers Strike : राज्य सरकारकडून बडतर्फीचं हत्यार
ST Bus

एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers Strike)सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देऊनही अनेक कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यानंतर राज्य सरकारकडून (maharashtra government)आजपासून बडतर्फीची (suspend)कारवाई करण्यात सुरूवात झाली आहे.

ST Bus
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers Strike)आजपासून शो कॉज नोटीस देण्यास सुरुवात केल्याचीही माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतरही कामगार कामावर राहिले नाहीत. त्यानंतर राज्य सरकारने (maharashtra government) कारवाईला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

ST Bus
या फोटोंनी सोनाली कुलकर्णीचे खुललं सौंदर्य

कशी असणार कारवाई

जे कर्मचारी कामावर हजर राहिलेले नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस आजपासून बजावण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर तीन सुनावणी होतात त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस दिली जाते.या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com