एसटी कर्मचारी संघटनांना राज्य सरकारचा जीआर अमान्य; संपावर ठाम

एसटी कर्मचारी संघटनांना राज्य सरकारचा जीआर अमान्य; संपावर ठाम

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण, वेतन व इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप (st workers strike)सुरु आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने (state goverment)तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. राज्याचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहे. यासंदर्भातील जीआर काढला आहे. परंतु हा जीआर कर्मचारी संघटनेने अमान्य केला असून संपावर कायम राहणार असल्याचे सांगितले.

एसटी कर्मचारी संघटनांना राज्य सरकारचा जीआर अमान्य; संपावर ठाम
अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

राज्य सरकारने काढलेल्या जीआरमधील तपशील एसटी कर्मचारी संघटनांना मान्य नसल्याने संपाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

‘उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे राज्य सरकारने समिती स्थापनेचा जीआर काढला असून या समितीने लगेचच सायंकाळी चार वाजता बैठक घेऊन त्याचे इतिवृत्तही तयार केले आहे’, अशी माहिती मुख्य सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी खंडपीठाला दिली.

महाराष्ट्र सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत मुख्य सचिवांशिवाय अर्थ आणि परिवहन खात्याचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश आहे. ही समिती सर्व 28 कामगार संघटना तसेच महामंडळाचे कर्मचारी यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.

12 आठवड्यात अहवाल देणार

8 नोव्हेंबरपासून 12 आठवड्यात ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना सरकारने समितीला केली आहे. या दरम्यान समितीच्या सुनावणीबाबत 15 दिवसांनी हायकोर्टाला माहिती देण्यात यावी असेही सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

एसटी कर्मचारी संघटनांना राज्य सरकारचा जीआर अमान्य; संपावर ठाम
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

राज्यातील 223 आगार बंद

राज्यातील 250 पैकी 223 आगारं बंद आहेत. राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात असल्याचा फटका कर्मचाऱ्यांनाही बसत असून एस.टी. तोट्यात असल्याचं कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढ नाही. करोना संकटकाळात सेवा बजावताना 306 एस.टी. कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर आर्थिक विवंचनेतून आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या केल्या. अशी बिकट परिस्थिती असतानाही सरकार एस.टी. तोट्यात असल्याचं कारण देत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून पूर्णत्वास नेत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com