एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून गोपीचंद पडळकर, खोत यांची माघार

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून गोपीचंद पडळकर, खोत यांची माघार
एसटी

एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers Strike)काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. एसटी कामगारांनी (ST Workers)उभारलेल्या लढ्याला मोठं यश आले असल्याचे सांगत एसटी कामगारांचे आंदोलन (ST Workers Strike)मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत (sadabhau khot)यांनी केली. पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असेही त्यांनी म्हटले.

एसटी
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम राहिल. मात्र, आम्ही पहिला टप्पा जिंकला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत, अशी घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली. विलिनीकरणाचा लढा सुरू असला तरी पहिला टप्पा जिंकलेला आहे. भविष्यात विलिनीकरणाची लढाई सुरूच राहिल. कामगार जेव्हा जेव्हा बोलवतील तेव्हा तेव्हा आम्ही जावू, अशी माहिती त्यांनी दिली.

कामगारांनी आता हजर व्हावे

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कमी पडणारी रक्कम देणार आहे. दोन पावलं सरकार पुढं आलं आहे. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज १२ पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं अवाहन सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे

प्रोत्साहन भत्ता

एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांचा मोठा हातभार असतो. यापूढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल, असे अनिल परब यांनी सांगितले.

एसटी
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

अशी असेल सुधारित वेतनवाढ (सरासरी)

१. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी ५ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे इतर भत्तासह त्याच्या एकूण वेतनामध्ये ७ हजार २०० रुपये वाढ होते.

२. १० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी ४ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे इतर भत्तासह त्याच्या एकूण वेतनामध्ये ५ हजार ७६० रुपये वाढ होते.

३. २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी २ हजार ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे इतर भत्तासह त्याच्या एकूण वेतनामध्ये ३ हजार ६०० रुपये वाढ होते.

४. ३० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी २ हजार ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे इतर भत्तासह त्याच्या एकूण वेतनामध्ये ३ हजार ६०० रुपये वाढ होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com