Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांचे मोठे वक्तव्य : एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण नाहीच

अजित पवारांचे मोठे वक्तव्य : एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण नाहीच

मुंबई :

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे (st strike)आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात दुसरा झटका आज एसटी कर्मचाऱ्यांना बसला आहे. कामगार न्यायालयाने (court)चपराक लवल्यानंतर आता एस.टी.कर्मचाऱ्याचे विलिनीकरण होणारच नाही, ते डोक्यातून काढून टाकावे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केले.

- Advertisement -

ही बँक नव्हे, तर आयकर धाडीत सापडलेले कोट्यावधी रुपये

शुक्रवारी सकाळी कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या (Termination)कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर आज सभागृहात बोलतांना अजित पवार म्हणाले, कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची आम्ही हमी घेतली आहे. परंतु एस.टी.कर्मचाऱ्याचे विलिनीकरण होणारच नाही.

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

काय म्हणाले अजित पवार?

  • प्रत्येकाने हट्ट केला विलिनीकरण करा, आम्हाला सरकारमध्ये घ्या तर ते कुठल्याही सरकारला ते शक्य होणार नाही.

  • कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजेत ते करत आहोत.

  • एसटी संप मिटविण्यासाठी आम्ही चर्चा केली, सकारात्मक भूमिका घेतली होती.

  • पगार १० तारखेपर्यंत देण्याची हमी दिली आहे.

  • टोकाची भूमिका घेऊन गिरणी कामगारांची वाट लागली.

- Advertisment -

ताज्या बातम्या