Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याएस.टी.चे 'इतके' कोटी सरकारकडे थकीत

एस.टी.चे ‘इतके’ कोटी सरकारकडे थकीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एसटी बस (ST Bus) मध्ये विविध समाज घटकातील नागरिकांना प्रवाशी भाड्यात सवलत दिली जाते. त्याची प्रतीपूर्तीची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून

- Advertisement -

थकली असून सन 2021 व 2022 मधील एकूण 389 कोटी येणे बाकी आहे. आत्ता पर्यंतची एकूण अंदाजे 600 कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे.

स्वातंत्र्य सैनिक (freedom fighter) व त्यांचे साथीदार 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण (education) घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी (students), अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व साथीदार, सिकल सेल (Sickle cell), डायलेसिस रुग्ण (Dialysis patients) अशा काहींना संपूर्ण मोफत प्रवास तर काहीना 50% सवलत प्रवाशी भाड्यात दिली जात आहे.

एकूण एसटी बस (ST Bus) मध्ये 29 प्रकारच्या सवलती दिल्या जातात. सरकार टाळाटाळ करीत असून एसटी सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या