एसटी संपासंदर्भात शरद पवार-अनिल परब यांच्यात झाली ही चर्चा

एसटी
एसटी

विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कामगारांच्या संपावर (MSRTC Strike) अद्यापही तोडगा निघालेला नाही. यामुळे चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी अखेर ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar)यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची अनिल परबांसोबत (Anil Parab) वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे देखील बैठकीला उपस्थित होते.

एसटी
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

वरळीतील एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली.

अनिल परब यांनी ही माहिती दिली

बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, मागील काही दिवस एसटी संप सुरु आहे, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे, ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत. आज मला शरद पवार यांनी बोलावलं होतं. अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली. यातून काय मार्ग निघू शकतो, संप कसा मिटू शकतो त्याबाबत प्रयत्न करण्याबाबत, एसटीची आर्थिक परिस्थिती, एसटी रुळावर कशी येईल, संपकऱ्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर चर्चा झाली. शरद पवार यांना सर्व माहिती दिली. याबाबतीत वेगवेगळे पर्याय कसे काढता येतील, मार्ग काढून कामगार आणि जनतेचं समाधान करता येईल याबाबतही चर्चा झाली. विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समिती समोर आहे. सरकारने या समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याबाबतचा अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारु. हा अहवाल हायकोर्टाच्या समितीच्या माध्यमातूनच येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com