Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकहून लालपरी निघाली; प्रवाशांचा थंड प्रतिसाद

नाशिकहून लालपरी निघाली; प्रवाशांचा थंड प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या पाच महिन्यांपासून आगारात विसावलेली लालपरी आजपासून (दि. २०) आंतरजिल्हा प्रवासासाठी निघाली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानक तसेच नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशांनी गर्दी केलेली दिसून आली. प्रवाशांना यावेळी एसटीकडून करोनापासून बचाव करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

शहरातील सी. बी. एस व महामार्ग बसस्थानकावरुन पुणे, मुंबई, बोरीवली, औरंगाबाद, धुळे, कसारा या मार्गांवर शिवशाही, निमआराम व साध्या राज्य परीवहन बसेस चालविल्या जाणार आहेत, अशी माहिती नाशिक विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी देशदूतशी बोलताना दिली.

कराेना संकटाचा सामना करतानाच मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लालपरीची सेवा सुरू करावी अशी मागणी केली जात हाेती.

त्यानुसार आंतरजिल्हा बस वाहतुक सुरु करण्यास परिवहन महामंडळाने विभाग नियंत्रकांना परवानगी दिली. यानंतर आजपासून गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली लालपरी रस्त्यावरून धावू लागली आहे.

असे आहेत नियम

या बससेवेत प्रति बस ५० टक्के आसन प्रत्येक बसमध्ये फक्त २२ क्षमतेने प्रवाशांना प्रचलित दराने प्रवास करता येईल. तसेच प्रत्येक प्रवाशास मास्क घालणे बंधनकारक राहील. चालविण्यात येणा-या बसेस हया पूर्णतः निर्जतुकीकरण करुन चालविण्यात येणार असून तसेच प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार विविध मार्गांवर बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या