मुसळधार पावसात बस पुलावरुन थेट पाण्यात

मुसळधार पावसात बस पुलावरुन थेट पाण्यात

मुसळधार पावसात एसटी बस (ST Bus) थेट पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे.

मुसळधार पावसात बस पुलावरुन थेट पाण्यात
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

नदीवरुन पाणी वाहत असताना एसटी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. या पुलावरुन पाणी वाहून जात असतानाही चालकाने त्या पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली.

नांदेडवरून नागपूरकडे येताना उमरखेड समोरील पुलावरून वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडवरून बसलेल्या आठ प्रवाशांची नोंद एसटी महामंडळाच्या जीपीएस प्रणाली वरून झाली आहे. या बसमध्ये उमरखेड वरून पुन्हा किती प्रवासी बसले याची मात्र नोंद नाही. यामुळे बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, यासंदर्भात अद्याप निश्चित माहिती नाही. ही बस घाटरोड डेपोची असून वाहन चालक सतीश रंगप्पा सूरेवार (53) आणि कंडक्टर भिमराव लक्ष्मण नागरीकर (56) हे सेवेत होते. काल रात्री 10 वाजता प्रवासी घेऊन हे दोघेही नांदेडला निघाले होते. यानंतर, मंगळवारी सकाळी 05:18 वाजता ही बस नांदेडवरून निघाली. तिकीट मशीनला जोडलेल्या जीपीएस प्रणाली नुसार या बसमध्ये आठ प्रवासी होते. त्यातील 4 हदगाव व 4 प्रवासी दिग्रसला उतरणारे होते. उमरखेडवरून ही बस 7.30 वाजता दिग्रसमार्गे नागपूरकडे निघाली. हे घटनास्थळ उमरखेड पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने किती प्रवाशांचे बुकिंग झाले हे मात्र कळू शकलेले नाही.

Related Stories

No stories found.